कारेगाव येथील रिलायन्स टॉवरच्या बॅटऱ्यांची दोन ठिकाणाहुन चोरी

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी रिलायन्स कंपनीचे दोन टॉवर असुन या दोन्ही टॉवरच्या अंदाजे 59 हजार 200 रुपये किंमतीच्या बॅटऱ्या अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असुन रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपणीचे फिल्ड इंजिनीअर उत्तम धोंडीबा आसवले (वय 54 वर्ष) रा. निमगाव भोगी ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपणीचे फिल्ड इंजिनीअर उत्तम आसवले यांच्याकडे कंपणीच्या अंतर्गत असलेल्या शिरूर ते कोरेगाव भिमा येथील टॉवरवर देखरेख करण्याचे काम आहे. दि 16 जानेवारी रोजी उत्तम आसवले यांनी सकाळी 10.30 च्या सुमारास कारेगाव येथील जय मल्हार डेव्हलपर्स शेजारी असलेल्या रिलायन्स टॉवरला भेट दिली. त्यावेळी सदर टॉवरच्या शेजारी असलेल्या लोखंडी रँक मधील बॅट-यांची पाहणी केली असता सर्व बॅटऱ्या सुस्थितीत होत्या. तसेच टॉवरचे कामकाज व्यवस्थीत चालु होते. त्यानंतर दि 18 जानेवारी रोजी दुपारी 4 च्या सुमारास आसवले कारेगाव येथील जय मल्हार डेव्हलपर्स शेजारी असलेल्या रिलायन्स टॉवरला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना टॉवरच्या बाजुस असलेल्या लोखंडी रँक मधील बॅट-या दिसल्या नाहीत त्यामुळे त्यांनी सदर बॅट-याचा आजुबाजुस शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत.

त्यावेळी आसवाले यांना टॉवरच्या बॅट-या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. तसेच त्याचवेळी अनुराग चंद्रभुशण रागी (रा. साई पार्क, एम आय नगर 2 दिघी) यांच्याकडुन समजले की, त्याच्या देखरेखेखाली असलेल्या कारेगाव येथील अजित शिवाजी नवले यांच्या शेतामध्ये असलेल्या इंडस मोबाईल टॉवर अमर राजा कंपणीच्या बॅट-या दि 16 रोजी 12.00 ते दि 18 रोजी 12.00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्या आहेत. जय मल्हार डेव्हलपर्स शेजारील टॉवरमधील चोरीस गेलेल्या बॅट-याचे वर्णन 35 हजार 200 त्यामध्ये एक्साईड कंपणीच्या होल्ट च्या एकुन 22 बॅट-या प्रत्येकी 1600 रूपया प्रमाणे अनुराग चंद्रभुशण रागी यांच्या देखरेखेखालील असलेल्या इंडस मोबाईल टावरच्या बॅट-याचे वर्णन खालील प्रमाणे 24,000  त्यात अमर राजा कंपणीच्या एकुन 24 बॅट-या प्रत्येकी 1000 अशा एकुण 59 हजार 200 रुपये प्रमाणे वरील वर्णनाच्या व किमतीच्या टॉवरच्या बॅट-या चोरीस गेल्याचे लक्षात आले.

त्यामुळे रिलायन्सच्या टॉवरमधील 59 हजार 200 रुपयांच्या बँट-या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या असल्याने रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपणीचे फिल्ड इंजिनीअर उत्तम आसवले (वय 54 वर्ष) यांनी या अज्ञात चोरट्याविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली असुन आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैभव मोरे पुढील तपास करत आहेत.