उन्हाची वाढती तीव्रता पशु पक्षांसाठी चिंताजनक

शिरूर तालुका

पक्षांसाठी दाणा पाण्यासह खाद्य ठेवण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना देखील उष्णतेचा सामना करावा लागत असताना अनेक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसत असून काही पक्षांचे बळी जात आहे. परंतु नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे यांनी केले आहे.

सध्या उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चालेलेली असताना तापमान देखील उच्चांक गाठत आहेत. कित्येक ठिकाणी विहिरी तळ गाठू लागले असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके देखील धोक्यात आलेली आहेत. शेतामध्ये पाणी नसल्याने असंख्य पक्षी पाण्याच्या शोधात मनुष्यवस्ती तसेच घरांकडे धाव घेत आहेत. परंतु सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे काही पक्षांचा पाण्या अभावी मृत्यू होत आहे, तर काही पक्षी पाण्याच्या कमतरतेने आजारी पडल्याचे पक्षी मित्रांना आढळून येत आहेत.

सध्या अनेक ठिकाणी नागरिक जागरूक झालेले असल्याने पक्षांना पाण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र निसर्ग राखण्यासाठी पक्षांची मोठी गरज आहे. पक्षी टिकले तरच निसर्ग टिकणार असल्याने पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. सध्या नागरिकांनी शक्य तेथे पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करत मुठभर धान्य पक्षांना टाकणे गरजेचे आहे. पावसाचे दिवस सुरु होई पर्यंत नागरिकांनी पक्षांना पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर तसेच घराच्या छतावर पाणी ठेवावे, असे आवाहन देखील निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक अलताब सय्यद यांनी केले आहे.