करंदी व चौफुला परिसरात बस चालू झाल्याने बसचे स्वागत…

शिरूर तालुका

विकास दरेकर व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) परिसरातील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली पीएमपीएल बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना विकास दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर आज पुन्हा बस सेवा सुरु झाल्याने या बसचे जल्लोषात स्वागत करुन ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु PMPL बसच्या अनेक सेवा तोट्याचे कारण पुढे करत पीएमपीएल विभागाने बससेवा बंद केल्याने या परिसरातील गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.

याबाबत विकास दरेकर यांनी आंदोलनाचा इशारा देत अनेक पदाधिकाऱ्यांनी सदर बससेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा सुरु केला. अनेक पदाधिकाऱ्यांनी PMPL व्यवस्थापन यांना विनंती केल्याने अखेर व्यवस्थापनाने आपला बससेवा बंदचा निर्मय मागे घेत बस सेवा पुन्हा सुरु करत असल्याबाबतचे पत्र देखील विकास दरेकर यांना दिले होते. अखेर काल (दि. 25) रोजी सकाळी सकाळी बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून, ग्रामस्थ व प्रवाशांना पेढे वाटत, बसचे चालक व वाहक यांना फेटे बांधून ताशाच्या गजरात बसचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विकास दरेकर, वर्षा दरेकर, चंदन सोंडेकर, लहुशेठ दरेकर, ॲड. कांताराम नप्ते, अविनाश साकोरे, महेश साबळे पाटील, संतोष दरेकर सर, अशोक शेळके, दीपक बेंडभर, कुणाल बेंडभर, सूर्यकांत दरेकर, राघू नप्ते, चंद्रकांत नप्ते, अनिल नप्ते, रवी नप्ते, श्याम वेताळ, निलेश नप्ते, दिपक खेडकर, महेंद्र झेंडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान बसचे चालक संजय पाखरे व वाहक युनुस आतार यांचा फेटा बांधून ज्ञानेश्वरी भेट देत सन्मान करण्यात आला तर याबाबत बोलताना ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान वाटत असल्याचे विकास दरेकर यांनी सांगितले.