DEATH

शिक्रापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गजानन मंगल कार्यालय शेजारी लक्ष्मण भाकरे व मारोती पवार हे दोघे एका खोलीत राहण्यास आहे. (दि. २४) ऑगस्ट रोजी मारोती हा दुपारच्या सुमारास घरी आला असता लक्ष्मण दरवाजा उघडत नसल्याने मारोती दरवाजा ढकलून आतमध्ये गेला असता त्याला आतमध्ये लक्ष्मण याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

या घटनेत लक्ष्मण ब्रम्हानंद भाकरे (वय 23) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गडगा ता. नायगाव जि. नांदेड याचा मृत्यू झाला असून याबाबत मारोती माधवराव पवार (वय २७) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गोळेगाव ता. नायगाव जि. नांदेन यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.