साहेब शासकीय वाहनांवरील दंड भरणार तरी केव्हा…

आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशी आरटीओची वागणूक शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्ह्यात सर्वत्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते असून अनेक वाहन चालकांवर खटले दाखल होत असताना कारवाई मध्ये दुजाभाव करत आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशीच कारवाई पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असून […]

अधिक वाचा..

पंचायत समितीतील विनापरवाना वृक्षतोडी विरोधात कधी होणार कारवाई?

शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे. शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी […]

अधिक वाचा..

वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा महावितरणचे आवाहन

बारामती: चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरुन कारवाई टाळावी व गुडीपाडवा गोड करावा असे […]

अधिक वाचा..

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मा. सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने मा. सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे […]

अधिक वाचा..

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित करत याप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची मलठण मध्ये बेशिस्त वाहन चालकांवर मोठी कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालवत गोंधळ घालणाऱ्या आणि इयत्ता 10 च्या पेपरच्या अनुषंगाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलिसांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने विनाकारण फिरणाऱ्या तसेच वारंवार मारणाऱ्या 46 बेशिस्त वाहन चालकांवर […]

अधिक वाचा..

पाण्यासाठी आदिवासी महिलेला मारहाण; सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी…

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर मुंबई: राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, […]

अधिक वाचा..

वरवेली येथील उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चौकशी करुन कार्यवाही करणार

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल समुद्रामध्ये कोकण एलएनजीमार्फत ब्रेक वॉटरच्या कामाकरीता संरक्षण भिंत उभारली जात आहे. त्यासाठी वरवेली येथील गौण खनिज उत्खनन केले जाते आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने याबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील गावातील घरांना व विहिरींच्या बांधकामाला […]

अधिक वाचा..

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई: संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात धुलीवंदन दिनी मद्यपींना पोलिसांचा दणका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धुलीवंदन दिनी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारु पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी अनोख्या पद्धतीने कारवाई […]

अधिक वाचा..