खिदमत फाऊंडेशन भीमरत्न पुरस्कार सन्मानित

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजामध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर… गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशनने गेल्या 4 वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. शिरुर शहरातील […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण

शिरुर (तेजस फडके): छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान होते. त्यांनी जर त्या काळी सावित्रीबाई फुले यांना शिकवले नसते. तर आज मुली शिकल्या नसत्या, त्यांनी सावित्रीबाई यांना खंबीरपणे समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. त्यामुळेच आज महिला सुशिक्षित आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक […]

अधिक वाचा..

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

शिरूर: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील प्रगतिशील शेतकरी नितीन अर्जुन थोरात यांना पुण्यातील अल्पबचत भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंगळवारी प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार दरवर्षी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दिला जातो. पुरस्काराचे […]

अधिक वाचा..

अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण […]

अधिक वाचा..

शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९ ते २०२०, २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या […]

अधिक वाचा..

हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा; डॉ. अमोल कोल्हे

पुणे: दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही तर, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम मायबाप मतदारांचा आहे. त्यामुळे यापुढेही जनसामान्यांचे प्रश्न व मुद्दे लोकसभेत मांडण्याची जबाबदारी मी नक्की निभावेन अशी विनम्र प्रतिक्रिया पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच […]

अधिक वाचा..

पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार प्रदान 

पुणे: काव्यमित्र संस्थेच्या वतीने जाणारा राष्ट्रीय युवा चेतना हा पुरस्कार पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना नुकताच प्रदान केला गेला. काव्य मित्र संस्था गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी यंदाच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवत काही दिवसांपूर्वी पुरस्कार घोषणा केली होती. युवा चेतना पुरस्कारासोबतच आदर्श माता व राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार सुद्धा यावेळी […]

अधिक वाचा..

अशोक गांजे यांना राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार प्रदान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार 2023 अशोक दत्तात्रय गांजे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडले. सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कारासाठी शरदवाडी येथून उपसरपंच गणेशराव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, भजनी […]

अधिक वाचा..

कृषी सहायक जयवंत भगत ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्काराने सन्मानित…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी, धुमाळवाडी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक जयवंत भगत यांना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे, कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील व कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिल मेहेर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी […]

अधिक वाचा..