अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण अभियान, पूर्व शालेय शिक्षण, कुपोषण निर्मुलनासाठी VCDC राबविणे, पोषण ट्रॅकरमध्ये उत्कृष्ट कामकाज, अंगणवाडी सक्षमिकरणाअंतर्गत सुविधा वाढ करणे, परसबाग, लोकसहभाग, तसेच विविध प्रशिक्षण प्रभावीपणे राबवून नाविन्यपुर्ण उपक्रमामध्ये उत्कृष्ठ कामकाज केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल आहे.

त्यांनी २००६ पासून अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून प्रथम जुन्नर तालुका येथे सुरुवात केली. त्यानंतर आंबेगाव तालुका व सध्या त्या शिरूर तालुक्यात टाकळी हाजी या बीटा मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून चांगले काम करत आहे.