रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान होते. त्यांनी जर त्या काळी सावित्रीबाई फुले यांना शिकवले नसते. तर आज मुली शिकल्या नसत्या, त्यांनी सावित्रीबाई यांना खंबीरपणे समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. त्यामुळेच आज महिला सुशिक्षित आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलींना शिकवले पाहिजे. जेव्हा सर्व मुली सुशिक्षित होतील, तेव्हाच त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.

मंगळवार (दि 11) रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त शिरुर येथील नगरपालिका शाळा क्र.5,मुंबई बाजार, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तसेच शाळेतील शिक्षक भानुदास हंबिर सर यांना “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” देण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यकर्तृवाविषयी माहिती दिली. यावेळी रवींद्र खांडरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पत्रकार किरण पिंगळे, उषा वेताळ, अंजली माने, नंदा वेताळ, वंदना भोसले, समिधा यादव, कुसुम लांबी, धनंजय जाधव तसेच शिक्षक वृंद सर्व उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे अजिज पठाण यांनी आभार मानले.