अशोक गांजे यांना राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार प्रदान…

महाराष्ट्र शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार 2023 अशोक दत्तात्रय गांजे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडले. सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

या पुरस्कारासाठी शरदवाडी येथून उपसरपंच गणेशराव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, भजनी मंडळाचे सर्व सहकारी कुंडीलक सरोदे, बाळू डव्हणे, माऊली सरोदे, विकास सरोदे, संदीप खाडे, रवीदादा सरोदे, स्वप्नील गांजे आणि भास्कर गांजे उपस्थित होते.

अशोक महाराज गांजे हे गेली १५ वर्ष या वारकरी संप्रदायामध्ये बेट भागात काम करीत आहे ते गावचा अखंड हरिनाम सप्ताहमध्ये कीर्तन साथ, भजन, काकडा यामध्ये सहभाग घेऊन यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणून योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याने बेट परिसरातून त्यांचे कौतुक होते असून माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, घोडगंगा साखर कारखान्याचे मा. संचालक राजेंद्र गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.