crime

अहमदनगरमध्ये युवकाला न्यायाधीशांसमोरच मारहाण; कारण…

महाराष्ट्र

अहमदनगर: भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच मारहाण करण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून या युवकाला मारहाण करण्यात आली आहे. अमाल हुंबे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

स्वातंत्र्यदिनी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर काही जणांनी भारताविरोधी घोषबाजी केली होती. या युवकांना पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केले होते. मात्र, सुनावणी सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी अमोल हुंबे यांनी त्या युवकांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयात गोंधळ उडाला होता.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार अमोल हुंबे यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. मात्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिकमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या तरुणावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादाब शौकत कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…

अहमदनगरमधील विवाहाची जोरदार चर्चा; शुभ मंगल नव्हे तर…

अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकले; अंबादास दानवे