वाडागावात महिलेसह पतीला कोयत्याने मारण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून हातात कोयता घेऊन महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेसह महिलेच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत ज्ञानेश्वर ढोरे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) येथे चंद्रकांत ढोरे याने त्याच्या पत्नीशी वाद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सदर 14 वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी शाळेत जात […]

अधिक वाचा..

महीलेवर अत्याचार करुन तिच्या पतीची निर्घृण हत्या…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गंगापूर तालुक्यात शेजारीच राहणाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार करत तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलेलाही याबाबत कुठे वाच्च्यता केलीस तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तब्बल 5 दिवसांनी महिलेने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या कंपनीत आम्हाला माथाडी कामगारांचा ठेका द्या नाहीतर…

सणसवाडीत कंपनीकडून खंडणी घेणारे दोघे जेरबंद  शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत व्यवस्थापकाला धमकी देत माथाडी कामगारांचा ठेका मागून ठेका द्या अन्यथा कंपनी बंद पाडू असे म्हणून खंडणी मागणाऱ्या दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत राजू मनोहर दरेकर व निखील नामदेव खेंगत या 2 खंडणीखोरांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश […]

अधिक वाचा..

शिवतक्रार म्हाळुंगीत सख्या भावाकडून भावाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरुर येथे गोठ्याच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावासह वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश साहेबराव जगदाळे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे बबन जगदाळे यांच्या गोठ्याच्या विटा पडलेल्या असल्याने बबन सदर विटा गोळा करत असताना महेश सदर ठिकाणी […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत. नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी […]

अधिक वाचा..

शिरुर स्थानकातून महिलेचे साडेसात लाखांचे दागिने लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एस टी स्थानकात एस टी मध्ये बसणाऱ्या महिलेचे साडेदात लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील बस स्थानकातून श्रीगोंदा मध्ये जाण्यासाठी सुप्रिया रायकर हा आलेल्या असताना त्यांनी त्यांच्या जवळील सुमारे सात लाख पन्नास हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मारहाण करत युवकाचा मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून […]

अधिक वाचा..

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..