पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या युवक-युवतींसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रक (Annual Calendar) जाहीर करण्याची मागणी केली असून, सरकारने त्याची सकारात्मक दखल घेत एमपीएससीच्या धर्तीवर पोलीस भरतीचे वार्षिक कॅलेंडर तयार […]

अधिक वाचा..

नंदुरबारच्या साक्षरतेवर विधानपरिषदेत प्रश्नचिन्ह; सत्यजीत तांबे यांच्या मागणीनंतर ‘थर्ड पार्टी’ चौकशीचे सरकारचे आश्वासन

मुंबई: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या’ अंमलबजावणीवर विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मार्च २०२६ मधील साक्षरता मूल्यमापन परीक्षेसाठी विद्यार्थीच उपस्थित नसल्याचा मुद्दा मांडत त्यांनी कार्यक्रमाच्या परिणामकारकतेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तांबे यांनी सांगितले की, नंदुरबार हा राज्यातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला जिल्हा असून, २०११ च्या जनगणनेनुसार […]

अधिक वाचा..

संगमनेरसाठी स्वतंत्र RTOच्या मागणीला वेग; मंत्री सरनाईकांकडून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

मुंबई: संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) स्थापनेच्या मागणीला पुन्हा गती मिळाली आहे. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नव्या शासन निकषांनुसार स्वतंत्र RTO कार्यालयास मंजुरी देण्याची मागणी केली. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने […]

अधिक वाचा..

हत्ती–मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित करत सरकारने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा..

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून […]

अधिक वाचा..

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांच्या ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, काही ठिकाणी ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. या पैशांचा स्रोत, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी […]

अधिक वाचा..

नीट पेपरफुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; विजय वडेट्टीवार

नागपूर: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी नागपूर येथे केली. केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिकतेच्या आधारावर आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता, असे सांगत वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; महाविकास आघाडीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, […]

अधिक वाचा..

कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि […]

अधिक वाचा..

जनतेच्या पैशावर सत्ताधाऱ्यांची विलासशाही; विशेष सुविधांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची मागणी

मुंबई: वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि शासकीय खर्चावर तीव्र टीका करणारा लेख सध्या चर्चेत आला आहे. “जनतेचा पैसा जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसोयींसाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या विशेषाधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करण्यात आली आहे. लेखात पेट्रोल, गॅस, वीज, शिक्षण आणि औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जीवन […]

अधिक वाचा..