शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले […]

अधिक वाचा..

वरवेली येथील उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चौकशी करुन कार्यवाही करणार

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल समुद्रामध्ये कोकण एलएनजीमार्फत ब्रेक वॉटरच्या कामाकरीता संरक्षण भिंत उभारली जात आहे. त्यासाठी वरवेली येथील गौण खनिज उत्खनन केले जाते आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने याबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील गावातील घरांना व विहिरींच्या बांधकामाला […]

अधिक वाचा..

नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननावर तात्काळ बैठकीचे आयोजन करा

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आज विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतात अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत आ. सुनील शिंदे, आ. विलास […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यातील बहादुर गडावर गुप्तधनाच्या अमिषापोटी उत्खनन

श्रीगोंदा (प्रतिनिधी): स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक बहादुर गडावरील भग्नावस्थेत असलेल्या हमामखान्यात अनेक दिवसानंतर काही अज्ञात लोकांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी पुन्हा उत्खनन केले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून रात्रीच्या वेळेस किल्ल्यावर पुरातत्व विभागाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली नसल्याने ही घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी दुर्लक्षित असलेल्या […]

अधिक वाचा..