शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले आहे.

कोंढापूरी येथील तलाठ्याने जाणीवपुर्वक अनाधिकृत उत्खनन व गुंठेवारी करणाऱ्या प्लॉटिंग वाल्यांना साथ देत चुकीचा पंचनामा सादर केला आहे. शासनाची दिशाभुल करणाऱ्या कोंढापुरी येथील तलाठी यांची दप्तर तपासणी करून गट नं. १२९ / २ चा फेरपंचनामा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोंढापूरी येथील गट नं. १२९/२ मध्ये कित्येक दिवसांपासून अवैधरित्या व्यवसायिक वापरासाठी मुरूम उत्खनन केलेले असुन मुळ मालक प्रविण ज्ञानोबा दरवडे व गणपत दौलत नरवडे यांनी सदर गटामध्ये प्रत्येकी १० आर.चे क्षेत्र हे प्लॉटिंग करून विकलेले आहे. त्या खरेदीदारांची नोंद ७ / १२ सदरी झालेली आहे. त्यामुळे या जमीनीचे चार मालक झालेले आहेत.

सदरच्या मुरूम विक्रीचा हिस्सा हा दस्ताच्या नकाशानुसार अभिषेक गायकवाड यांच्या नावे गेल्याचा सत्कृत पुराव्यानिशी दिसत आहे. तसेच सदरच्या जागेची विक्री ही १६ फुट रस्ता देवुन प्लॉटिंगसाठी केलेली दिसत आहे. याचा पुरावा सोबत जोडत आहे. सदरचा गट हा शेतीसाठी नसल्याचे पुरावे सोबत अर्जदाराने जोडलाआहे.

यापूर्वीदेखील या जमीनीच्या मालकांनी शासनाची फसवुणक केलेली आहे. पुर्वी एकदा सदर गटाच्या उत्खननाबाबतही झालेल्या केस संदर्भात सदरचे मा. तहसिलदार सो. यांच्याकडील क्र. क. गौ ख / उल्ख अना. दंड / एसआर / १२ / २०२० दि. ०३/ ०३ / २०२१ अन्वये अनाधिकृत मुरूम गौणखनिज उत्खनन दंड, रक्कम रूपये २१,६०,१०५/- बोजा गट नं. १२९ / २ वर दाखल फेरफार क्र. ४३८८ ने ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्यात आला. त्यानंतर सदरच्या प्रकरणाबाबत मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचा आदेश क्रमांक : आरटीएस / अ / १११ / २०२२ दि. १५/०७/२०२२ अन्वये मा. तहसिलदार यांनी पारित केलेला आदेश रद्द केला व फेरफार क्र. ४६५३ ने ७/१२ उताऱ्यावरील बोजा रद्दबादल केला.

सदरच्या गटामध्ये राजरोस पणे अजुनही अवैधरित्या व्यवसायिक वापरासाठी मुरूम उत्खनन चालु आहे. त्याबाबत शेळके यांनी तहसिलदार शिरूर यांना (दि ३१) जुलै रोजी पत्र दिले होते. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने तहसिलदार शिरूर यांनी सदर जमीन मालकांना सुनावणी नोटीस काढली आहे. परंतू सदरच्या गटातील पंचनामा तलाठी कोंढापूरी यांनी चुकीचा केलेला असुन त्यांच्या पंचनाम्यात बेकायदेशीर प्लॉटिंगचा तसेच सदरच्या गटामध्ये गुंठ्याचे प्लॉट पाडल्याचा कुठलाही उल्लेख दिसुन येत नाही. प्रत्यक्ष दर्शनी त्या गटाचे फोटो सोबत जोडले आहे. तसेच सदरचा प्लॉट सपाट करण्यासाठी मुरूम उकरल्याचे तलाठी यांनी पंचनाम्यात नमुद केलेले आहे. परंतू प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच दिसुन येत असुन जमीन मालकांनी सदर गटातील मुरूम व्यवसायिक कामासाठी विकला आहे हे प्रत्यक्षदर्शनी दिसुन येत असुनही मौजे कोंढापुरी येथील तलाठी यांनी (दि. ०२) जुलै रोजी सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यान हा पंचनामा केल्याचे कागदपत्रांमधुन दिसुन येत आहे. परंतू केवळ जमीन मालकांना वाचविण्याचा तलाठ्याने प्रयत्न केल्याचा आरोप बाळासाहेब शेळके यांनी केला आहे.