‘दादा’विना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; विरोधी पक्षनेत्याविना इतिहासात प्रथमच सत्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी)पासून सुरू झाले असून ते २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. एकूण २० कामकाजाच्या दिवसांचे हे अधिवेशन अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अर्थसंकल्प सादर होणार असून त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: धमकीप्रकरणी बाहेर पडलेली दिव्या शिंदे पहिल्यांदाच बोलली; ‘विषय आता सुरू झाला…’

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश […]

अधिक वाचा..

ज्ञानदा रामतीर्थकर–हर्षद आत्माराम! साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच नात्याविषयी स्पष्ट खुलासा

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच ज्ञानदाचा हर्षद आत्माराम याच्याशी साखरपुडा पार पडला असून, या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच सविस्तरपणे भाष्य केलं आहे.ज्ञानदा आणि हर्षद यांनी राजश्री मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेमागची वाटचाल, घरातून होकार मिळवण्यासाठी केलेली प्रतीक्षा आणि त्यामागची कारणं उलगडली. ज्ञानदा म्हणाली,“हर्षदने त्याच्या घरी […]

अधिक वाचा..

11 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार

मुंबई: सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते. ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे […]

अधिक वाचा..

शरद पवार यांनी पहिल्यांदाच वापरले असे शब्द; आघाडीत ‘राज’ पर्व?

मुंबई: ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. थोड्यावेळी पूर्वी काँग्रेसच्या गोटातूनही तसेच संकेत मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केला. तर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याने काही अडचण होणार […]

अधिक वाचा..

लापता लेडीज’ बद्दल ऐकलं होतं, पण ‘लापता’ उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, 

मुंबई: राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे अशी मागणी केली. सिब्बल म्हणाले की, मला त्यांची काळजी वाटते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. यापूर्वी मी ‘लापता लेडिज’ बद्दल ऐकले होते, परंतु ‘लापता’ उपराष्ट्रपतींबद्दल मी […]

अधिक वाचा..

लष्करप्रमुखांनी पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ची उलगडली थरारक कहाणी; म्हणाले

मुंबई: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या तयारी आणि अचूक हल्ल्यांबद्दल पहिल्यांदाच सार्वजनिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑपरेशनची रणनीती अचूक होती, ती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती. हे एका अनिश्चित काळात घडले, त्यावेळी सर्व काही अनपेक्षित होते. लष्करप्रमुखांनी आयआयटी मद्रास येथे, लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल लोकांशी संवाद साधला. लष्करप्रमुख म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमध्ये, आम्ही जे केले […]

अधिक वाचा..

संसदेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी घडविले संसद दर्शन

शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव पारनेर: शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत दोऩशे हून २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.   त्यावेळी शिक्षकांना ख-या अर्ताने […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना […]

अधिक वाचा..