मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

महाराष्ट्र

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.”

त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो नागरिक अडकले आहेत. “इतक्या मोठ्या संकटाच्या वेळी सरकारकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा आपत्कालीन आराखडा नाही, हेच या तथाकथित विकासाचे खरे चित्र आहे,” सपकाळ यांनी म्हटले.

संपूर्ण ट्विटमध्ये त्यांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली सुरू असलेली लूट, निकृष्ट कामे आणि नियोजनाचा अभाव याचा गंभीर उल्लेख करत सरकारवर “ना जबाबदारी, ना संवेदनशीलता, ना उत्तरदायित्व हाच का तुमचा ‘विकास’?” असे सवाल उपस्थित केला.