अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

  ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना संवेदनशील बनविण्यावर भर

मुंबई: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि अध्यापकांना अधिक संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथे आयोजित या कार्यक्रमास उच्च व […]

अधिक वाचा..

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव

मुंबई: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून २४x७ तत्पर, बहुभाषिक आणि सुलभ माहिती उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. या अभिनव आणि लोकाभिमुख कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाचा गौरव करण्यात आला. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता […]

अधिक वाचा..

कारकूड वस्ती शाळेत ‘आठवडा बाजार व आनंद मेळावा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकूड वस्ती ता. शिरूर येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव मिळावा या उद्देशाने ‘आठवडा बाजार व आनंद मेळावा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे धडे मिळावेत आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या हेतूने शाळेच्या प्रांगणात […]

अधिक वाचा..

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका; अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण

मुंबई: मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. २१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झालेल्या या स्पर्धेत अवघ्या एका आठवड्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून स्पर्धक सहभागी झालेच; शिवाय भारताबाहेरूनही पाकिस्तान […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचा उपक्रम

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे स्व. अरुण सरनाईक यांच्यावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पुढाकार

मुंबई: समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले. त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा; चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचे आवाहन मुंबई: केंद्र शासनाने “राष्ट्रीय क्वांटम मिशन (National Quantum Mission – NQM)” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा मुख्य उद्देश आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर मुंबई: ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम ‘आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून गरजूंसाठी ‘समाज सेवा कक्ष’ व ‘शक्ती कार्ड’ उपक्रम

महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना तातडीच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई: राज्यातील सर्वसामान्य कुटुंबियांचा प्राथमिक आरोग्यावरील खर्च कमी करणे व त्यांना तातडीनं सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेनेने ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ हे विशेष सामाजिक उपक्रम सुरु केले आहेत. शिवसेना समाज सेवा कक्षाचे ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून चैतन्य […]

अधिक वाचा..