महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती! महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपलांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्यासाठी परिवहन विभाग पथदर्शक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेलफेरे अससोसिएशन आयोजित लॉजिस्टिक्स समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

राज्यसभेसाठी भाजपचं ‘धक्कातंत्र’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? महाराष्ट्रातील ७ जागांवर मोठी राजकीय हालचाल

मुंबई: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार असून त्यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजप यावेळी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. २ एप्रिल २०२६ रोजी खालील सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे  Sharad Pawar (राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञान-उद्योग सहकार्याला नवी गती; महाराष्ट्र-वाकायामा संबंध अधिक दृढ होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानमधील वाकायामा प्रांत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी […]

अधिक वाचा..

यंदा सांगलीत रंगणार ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा विशेष सन्मान

मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून, दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा; चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचे आवाहन मुंबई: केंद्र शासनाने “राष्ट्रीय क्वांटम मिशन (National Quantum Mission – NQM)” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा मुख्य उद्देश आहे. […]

अधिक वाचा..