‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून अंतर्गत मतभेद आणि अविश्वास समोर येत असतो. आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे विधान गुलाबराव पाटील […]

अधिक वाचा..

पुणे पदवीधरवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपमध्येच इच्छुकांची भाऊगर्दी, राष्ट्रवादीचाही दावा

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याने महायुतीतील जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी नोंदवली. विजयी उमेदवारांची यादी छत्रपती संभाजीनगर – जालना : सुहास शिरसाट (भाजप) ठाणे : […]

अधिक वाचा..

महायुती सरकारवर नैतिकतेचा प्रश्न; झिरवाळांच्या VDO प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. […]

अधिक वाचा..

कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार 

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . कुर्ला पश्चिम येथील वाॅर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महीलांसाठी राखीव आहे.या मतदार संघातून काॅग्रेस ,समाजवादी पार्टी,शिवसेना उबाठा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अपक्ष […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

महायुतीचं वाढणार टेन्शन! भाजपा- शिंदेंची सेना आमने-सामने

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत’ अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदाराकडून मित्रपक्षाबद्दलच वापरली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षालाच लक्ष्य करण्याचा आमदाराचा मानस आहे. याचा फटका महायुतीला […]

अधिक वाचा..

महायुतीत निधीवरून नवा वाद

पुणे: राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि सत्तेतील भागीदारांमधील नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नगरविकास खात्यातील मोठ्या रकमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे. यामुळे फडणवीस यांनी शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि भरभरून निधी खर्च […]

अधिक वाचा..

महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले; नाना पटोले

सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले मुंबई: महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक […]

अधिक वाचा..