शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत हाणामारी…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत लोखंडी पाईप, दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मलठण (ता. शिरूर) येथे विकास सुभाष बोडरे (वय २३ वर्षे ) याने पानटपरीवर खाल्लेल्या पानाचे पैसे दिले असतानाही पानाचे पैसे दिले नाहीत, पैसे दे असे म्हणत शिविगाळ केली. आरोपी सद्दाम शेख, रशिद शेख, सुरज रोकडे (सर्व रा. मलठण) व रशिद शेख याचे पानटपरीवरील अनोळखी व्यक्ती (रा. शिरूर) यांनी विकास बोडरे याला लोखंडी पाईप व दगडाने मारहाण केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, २० फेबुवारी रोजी रात्री ०२.३० वा. चे सुमारास मलठण गावच्या हद्दीत एस.आर पानटपरीसमोर सद्दाम शेख, रशिद शेख, सुरज रोकडे व रशिद शेख याच्या पानटपरीवरील अनोळखी व्यक्ती यांनी विकास बोडरे याला पानटपरीवर पानाचे पैसे दिले असतानाही पैसे दिले नाहीत, पैसे दे ..असे म्हणत शिवीगाळ दमदाटी सुरू केली. विकास बोडरे याला खाली पाडुन सुरज रोकडे व अनोळखीने लोखंडी पाईपाने दोन्ही पायाच्या तळपायावर मारहाण केली.

विकास बोडरे त्यांच्या तावडीतून सुटुन गेल्यानंतर पुन्हा त्यांनी दोन मोटार सायकलवर येवून सरकारी दवाखान्याजवळ त्याला पकडून तेथे हाताने, लाथाबुक्यांनी व दगडाने त्याच्या डोक्याला, तोंडाला, पायाला मारून दुखापत केली. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून पुन्हा मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत विकास बोडरे याने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये चौंघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक धनंजय थेऊरकर हे करत आहे.