गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही…

अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवार मुंबई: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या […]

अधिक वाचा..

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? मुंबई: मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा […]

अधिक वाचा..

भाजप कार्यकर्त्याला आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक

मुंबई: दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने मारहाण केल्याचा मुद्दा आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडून याप्रकरणी सरकारने खुलासा करावा, तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात […]

अधिक वाचा..

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरु आहे; जयंत पाटील

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला […]

अधिक वाचा..

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. (दि १९) रोजी याच ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी मजूरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधान राखून मजूरांनी आरडाओरडा केला व तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजूराच्या डोळ्याला जखम […]

अधिक वाचा..

जुन्या पेन्शन योजनेच्या संपामुळे नागरीकांचे होतायेत प्रचंड हाल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने गेल्या ७ दिवसापासून शिरूर तहसिल कार्यालतील पुरवठा विभाग, सेतू विभाग, तलाठी कार्यालय व विविध संकलंन विभाग, दुय्यम निंबधक, कृषी विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख कार्यालय बंद असून या विभागातील नागरीकांची विविध कामे संपामुळे मोठया प्रमाणावर खोळंबली आहे. तसेच तालुक्यातील गेल्या 7 दिवसापासून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिक्षक संपात […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीला दमदाटी करत मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखानशेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर हॉटेल अजिंक्यातारा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गोविंद संग्राम पवार या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या अजिंक्यतारा हॉटेल समोरुन गोविंद पवार हे रस्ता ओलांडत असताना पुणे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विवाहित महिलेचा सासू सासऱ्यांकडून छळ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका विवाहित महिलेचा छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली शहादेव महाडिक, शहादेव महाडिक, पृथ्वीराज शहादेव महाडिक या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे मार्केट मधील शिला महाडिक या महिलेचे पती निलेश यांचे काही दिवसां[पूर्वी निधन झाले त्यानंतर तिचे सासू, […]

अधिक वाचा..