उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे. परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. […]

अधिक वाचा..

एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी दुर्गा…

नाशिक: तुम्ही जो फोटो पाहताय त्यात बाळाला समोर बांधून रिक्षा चालवताना जी दिसतेय, त्या महिलेच नाव चंचल शर्मा आहे. बाळाला तिने कडेवर घेऊन गच्च बांधून ती ई-रिक्षा चालवते. घर चालवण्यासाठी असं करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ नाही. नवरा छळायचा. अखेर एक दिवस तान्ह्या बाळासह बायकोलाही तो सोडून गेला. पदरात असलेलं एक वर्षाचं बाळ सांभाळयचं कसं? पैसे […]

अधिक वाचा..

PFI संघटनेच्या कार्यकर्त्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा अन्यथा…

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24) रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली. त्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ आज पुण्यातील अलका टॉकीज मनसेचे नेते अजय शिंदे आणि युवा सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला. […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन करुन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर गुन्ह्याची मागणी

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे रविवार (दि 25) पुणे- नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना; प्रा. हेमंत गावडे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श व्यासपीठ असून युवकांनी यातून बोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. हेमंत गावडे यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. हेमंत गावडे बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर होते […]

अधिक वाचा..

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे (दि. 25) रोजी पुणे नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचीच केली हत्या, पहा कारण…

बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]

अधिक वाचा..

सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. […]

अधिक वाचा..
Horoscope

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या राशीच्या मनोकामना होतील पूर्ण…

मेष: आज ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्याचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. तुमची दडपलेली इच्छा संततीद्वारे पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. कौटुंबिक प्रकरणे पुढे जाऊ शकतात. कोणताही वाद संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास ठेवा. वृषभ: आजचा जास्तीत जास्त वेळ कौटुंबिक कामात जाईल. तुम्हाला काही सर्जनशील कामातही रस असेल. पैशाच्या वितरणाशी संबंधित प्रकरणे परस्पर […]

अधिक वाचा..