शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास मंदिरात आले असताना त्यांना दानपेटी जवळ काही पैसे पडल्याचे दिसले त्यावेळेस त्यांनी पाहिले असता दानपेटीचे कुलूप तुटलेले आणि पत्रा उचकटला असल्याचे त्यांना दिसून आले.

याबाबतची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष मारकड व पोलीस शिपाई अंबादास थोरे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, उद्योजक संजय भुजबळ, युवा सेनेचे अध्यक्ष विजय लोखंडे, संतोष काळे यांसह आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली.

याबाबत शंकर रघुनाथ जूवर (वय 71) रा. भैरवनाथ मंदिर समोर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मुळ रा. अंतरगाव ता. कळंब जि. यवतमाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहे.