‘भिक्षा नको, सुरक्षा दया’ रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई बदलापुर येथील चिमुकलीच वय ३ वर्षे ८ महिने या वयात शी व शूची फारशी समजही आलेली नसते. याच वयात शु करायला जात असतांना शाळेतल्याच एका राक्षसी वृत्तीच्या ‘काका’ ने नको त्या वयात नको त्या यातना दिलेल्या असतात. या मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाले. हि घटना लाज आणि संताप या पलीकडची आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी […]

अधिक वाचा..

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरुर (अरूणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोडधरण जलाशयातुन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा तसेच विक्री होत होती. हि बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.   त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन […]

अधिक वाचा..

शिरुर येथील ‘सेंट जोसेफ’ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील नावाजलेल्या ‘सेंट जोसेफ’ या शाळेत रात्रीच्या वेळेस डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना चांगलेच भोवले असुन शाळेतील काही शिक्षकांसह तब्बल १७ जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा मद्यपी शिक्षकांचा शाळेतील विद्यार्थ्यांनी नक्की काय आदर्श घ्यायचा अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. जर […]

अधिक वाचा..

शिरुर; अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निलेश वाळुंज यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन…

शिरुर (अरूणकुमार मोटे) पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता (कलकत्ता) येथे डॉ. महिला व बदलापूर (महाराष्ट्र) मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी, न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्याच्या आणि अशा गंभीर घटना गांभिर्याने न घेणाऱ्या दोषी पोलिसांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे शुक्रवार दि […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ढोकसांगवी गावच्या हद्दीत परीटवाडी रोडवर कंटेनरने चालकाच्या बेजबाबदार पणामुळे एका दुचाकीला धडक बसुन दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेले. त्यामुळे डोक्याला मार लागुन हनुमंत भरत गव्हाणे (वय ३८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असुन याबाबत त्यांची पत्नी सुवर्णा हनुमंत गव्हाणे (वय ३२) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव MIDC तील जामिल कंपनीत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC तील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जड जॉब हाताळता न आल्याने शिवबाबू कमलेश शाहू (वय २३) मुळ रा. मनकापुर, ता. मजखनपुर, जि.कोसंबी (उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाल्याने कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे तसेच बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…

शिरुर (अरुणकुमार मोटे) बदलापुर (मुंबई) येथील शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज (दि २१) रोजी शिरुर येथील इंदिरा गांधी पुतळा ते तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार […]

अधिक वाचा..

घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच ‘वरातीमागुन घोड’ शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान एकुण ३५ हजार रुपये किंमतीची ७ ब्रास वाळू अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची फिर्याद न्हावरे येथील मंडळ अधिकारी नंदकुमार संपतराव खरात यांनी दि २० ऑगस्ट २०२४ रोजी शिरुर पोलिसस्टेशन येथे दिली आहे.   शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) सरदवाडी (ता.शिरुर ) येथील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथे नुकतेच स्विफ्ट अन् लिफ्ट यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच उद्योगात गगनभरारी घेणाऱ्या यशस्वी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे ‘विजय हिंदू’ या नावाने कुंडलिक यांचे […]

अधिक वाचा..