निमगाव म्हाळुंगीत किरकोळ वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतातील वादातून इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारहाणीमध्ये व्यक्तीच्या हाताचे बोट तुटल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी दिनकर गोरडे व गुण्या उर्फ अभिनव संभाजी गोरडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हरीचंद्र रणदिवे यांच्या […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय सोपान रणसिंग या इसमाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय रणसिंग हे २५ फेब्रुवारी रोजी घरी असताना रात्रीच्या सुमारास त्यांची पत्नी घरात आली असता तिला पती अजय यांनी […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत आढळला पुरुषाचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे दिवाळी च्या निमित्ताने सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत वकिलाची जमीन व्यवहारात फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील काही इसमांनी एका वकिलाची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्र्यंबक केरू यादव, शिवाजी केरू यादव, गणेश त्र्यंबक यादव, अमोल त्र्यंबक यादव, संतोष शिवाजी यादव, रमेश शिवाजी यादव व सागर यशवंत कंक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सविता करपे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र रणसिंग यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने नुकतीच […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जलदिंडी प्रतिष्ठान, साईक्रांती प्रतिष्ठाण तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्ष दत्तक योजना राबवण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने साईक्रांती प्रतिष्ठाण, शिवराज्य प्रतिष्ठाण व जल पर्यावरण समिती यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या […]

अधिक वाचा..