निमगाव म्हाळुंगीत वकिलाची जमीन व्यवहारात फसवणूक

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील काही इसमांनी एका वकिलाची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्र्यंबक केरू यादव, शिवाजी केरू यादव, गणेश त्र्यंबक यादव, अमोल त्र्यंबक यादव, संतोष शिवाजी यादव, रमेश शिवाजी यादव व सागर यशवंत कंक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील त्र्यंबक यादव व इतर लोकांनी त्यांची पुनर्वसन जमीन ॲड. आदित्य करपे यांना विकत देत त्यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले. त्यानंतर करपे यांच्याकडून जमिनीसाठी 6 लाख रुपये घेतलेले असताना यादव यांनी कंक यांना देखील जमीन घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही दोघे सदर जमीन विकत घ्या, असे सांगत जमिनीच्या व्यवहार बाबत विसर पावती करुन घेतली. मात्र त्यानंतर यादव व कंक यांनी संगनमत करत करपे यांच्या परस्पर अनुज सचिन यादव यांना जमीन विक्री करत ॲड. आदित्य करपे यांची फसवणूक केली.

याबाबत आदित्य रावसाहेब करपे रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी त्र्यंबक केरु यादव, शिवाजी केरु यादव, गणेश त्र्यंबक यादव, अमोल त्र्यंबक यादव, संतोष शिवाजी यादव, रमेश शिवाजी यादव व सागर यशवंत कंक सर्व रा. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.