शिरुर तालुक्यातील पारोडी गावात उद्या पिरसाहेबांची यात्रा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा उद्या मंगळवार (दि २८) ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी होणार असुन या यात्रेला राज्यभरातुन दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. पारोडी येथील पिरसाहेब यात्रेची सुरुवात सोमवारी मध्यरात्री १२ च्या दरम्यान पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक निघाल्यानंतर संदल होणार आहे. त्यानंतर फुलांची […]

अधिक वाचा..
parodi-temgire

शिरूर! पारोडीमध्ये ‘पिरसाहेब गुळ उद्योग समूह’चा शुभारंभ…

पारोडी (शिरूर): पारोडी येथील युवा उद्योजक अभिजीत तुकाराम टेमगिरे यांनी “पिरसाहेब कृषी सेवा केंद्र” या यशस्वी व्यवसायानंतर आता “पिरसाहेब गुळ उद्योग समूह” या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन आणि आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे […]

अधिक वाचा..

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात स्माईल फाउंडेशनकडून डेंग्यूच्या जनजागृतीसाठी आरोग्य कार्यक्रम

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) पारोडी, सातकरवाडी, शिवतक्रार व म्हळुंगी गावातील नागरिकांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी स्माईल फाउंडेशन, दिल्ली व फिलिप्स शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात कम्युनिटी मोबिलायझर प्रियांका मोहिते यांनी डेंग्यू आजाराच्या लक्षणांपासून ते प्रतिबंधात्मक उपायांपर्यंत सविस्तर माहिती दिली.त्या म्हणाल्या की, डेंग्यू हा एडीस डासांद्वारे पसरणारा विषाणुजन्य […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात नुकताच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित (वर्ष २०वे) अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली. टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाच्या जयघोषात अवघे ग्रामस्थ तल्लीन झाले होते. कोणी फुगडी खेळत, तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे १० जून रोजी रात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक मेंढी ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री ९.४५ वा. ही घटना शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या अंगणात घडली आहे. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत असून येथे डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने आरोग्य उपकेंद्रावर करोडो रुपये खर्च करून दोन मजली इमारत बांधून सर्व […]

अधिक वाचा..
crime

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हमाणारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले, लता थोरात या 9 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडीत उभारतेय नक्षत्र वन

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) हे स्वर्गीय माजी आमदार पोपटराव कोकरे व माजी उपसरपंच असलेले राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे ज्येष्ठ कै. विष्णुपंत कोकरे यांचे गाव असून या गावात पुणे जिल्ह्यातील पहिला नक्षत्र वन प्रकल्प उभारला जात असून नुकतेच येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे असून लवकरच येथे वनासह उद्यान उभारण्यात येणार आहे. पारोडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

पारोडीमध्ये आढळलेल्या जखमी कोल्ह्याला जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील सातकर वाडी येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील कोल्ह्याला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असून सदर कोल्ह्याला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) येथील सातकरवाडी मधील सुरेश सातकर यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास एक कोल्हा जखमी अवस्थेत बसला असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती इंडिया […]

अधिक वाचा..