प्रियंका धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका अशोक धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रियंका धोत्रे या गेल्या दहा वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील पहिले ढोल ताशा पथक आणि युवा वाद्य पथक चालवत असुन आठ वर्षांपासुन शिरुर शहरामध्ये युवा स्पंदन ही सामाजिक संस्था चालवत आहेत. या संस्थेच्या मार्फत त्यांनी रक्तदान […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या विद्याधाममध्ये टाळमृदुंगाचा गजर

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अनोखे कीर्तन शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून अनोख्या पद्धतीने कीर्तन संपन्न झाले असल्याने विद्याधाम मध्ये टाळमृदुंगाचा गजर झाला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात आझाद समाज पार्टीच्या अध्यक्षावर दगडफेक

एका वकीलासह दोघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुका महिला अध्यक्षाला शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी देत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे या तिघांवर ॲट्रॉसिटी सह […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी प्रमोल कुसेकर 

“कार्याध्यक्ष” पदी तेजस फडके तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी किरण पिंगळे  शिरुर: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रमोल कुसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर सचिवपदी सागर रोकडे यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. शनिवार दि. 24 डिसेम्बर […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी…

मुंबई: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी वामनराव नाणेकर

शिक्रापूर (शेरखान शेख): मोराची चिंचोली (ता. शिरुर) या पर्यटन क्षेत्र असलेल्या गावची तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावची विशेष ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली, यावेळी गावच्या जलजीवन मिशन, वन समिती, कोविड लसीकरण या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी करंजे तर सचिवपदी डॉ. भोसुरे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून यावेळी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे तर सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांची निवड करण्यात आली असून मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांनी देखील पदभार स्वीकारला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, […]

अधिक वाचा..