शिक्रापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी करंजे तर सचिवपदी डॉ. भोसुरे

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून यावेळी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे तर सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांची निवड करण्यात आली असून मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांनी देखील पदभार स्वीकारला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा, सहाय्यक प्रांतपाल विलास काळोखे, आमदार ॲड.अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, उपसरपंच मयूर करंजे, माजी उपसरपंच रमेश थोरात, मच्छिंद्र गायकवाड, लधाराम पटेल, प्रीतम शिर्के, रमेश भुजबळ, रवींद्र भुजबळ, मनोहर परदेशी, डॉ. रामदास पोटे, डॉ. शरद लांडगे, बाजीराव भाकरे यांसह आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष वीरधवल करंजे व सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांनी मावळते अध्यक्ष रमेश भुजबळ व सचिव मनोहर परदेशी यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला. तसेच नवीन संचालक मंडळाची नियुक्ती जाहीर करत या वर्षीच्या नवीन कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यात आली. रोटरीचे माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मयूर करंजे, डॉ. विवेक भोसुरे, संजीव मांढरे, मनोहर परदेशी, डॉ. शरद लांडगे यांचा सन्मान करण्यात आला, तर रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे कार्य प्रशंसनीय असून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यात क्लब यशस्वी झाल्याचे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव मांढरे यांनी केले, प्रास्ताविक केले तर मयूर करंजे यांनी आभार मानले.