प्रियंका धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका अशोक धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रियंका धोत्रे या गेल्या दहा वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील पहिले ढोल ताशा पथक आणि युवा वाद्य पथक चालवत असुन आठ वर्षांपासुन शिरुर शहरामध्ये युवा स्पंदन ही सामाजिक संस्था चालवत आहेत.

या संस्थेच्या मार्फत त्यांनी रक्तदान शिबिर, तसेच महिला फिटनेस मॕरेथाॕन, पोलिसांसोबत मैत्रिदिन साजरा करणे असे उपक्रम राबविले आहेत. कोराना काळात त्यांनी शिरुर शहर तसेच शिरुर तालुक्यातील विविध भागात कोविड पेंशटला ब्लड, प्लाझ्मा आणि बेड मिळवून दिले असुन संपूर्ण महाराष्ट्रात कोराना काळात गरजूंना मदत केलेली आहे.

मानव विकास परिषदेच्या माध्यमातून समाज्यातील गोर-गरीब लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असुन या संघटनेची ध्येय, धोरणे समाज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रियंका धोत्रे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.