मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण ते कवठे या अष्टविनायक महामार्गावर दरम्यान सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने दुभाजकासह गतिरोधक व अन्य आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मलठण ते कवठे यादरम्यानचा अष्टविनायक महामार्ग शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातून गेला आहे. या महामार्गावरून दिवसरात्र मोठ्या […]

अधिक वाचा..
Jyoti-Mansing-Pachundkar

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव गटात राजकीय हालचालींना वेग आला असताना उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना पती मानसिंग पाचुंदकर यांची खंबीर साथ लाभत आहे. शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मानसिंग पाचुंदकर हे पत्नीच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत आहे. शिरूर-आंबेगाव मतदार संघामधील गावांमध्ये […]

अधिक वाचा..
babanrao-lawande

रांजणगाव गणपती येथील बबनराव लवांडे यांचे निधन

शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात फायनान्सच्या हप्त्यावरून युवकाच्या डोक्यात फोडली बाटली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील एका युवकावर मोटरसायकलच्या फायनान्सचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना शिरूर शहराच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण सावळा फुलारे (वय २३, व्यवसाय नोकरी, रा. आंधळगाव ता. शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. जाधव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका हादरला! दिव्यांग मुलीच्या शरिराचे तोडले लचके…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी येथे एका दिव्यांग मुलीचा श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीच्या शरीराचे लचके तोडल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित हल्ला नेमका बिबट्याचा आहे की भटक्या कुत्र्यांचा, याबाबत पोलिस आणि वनविभाग तपास करत आहेत. मेघना ईश्वर काळे (वय १४) असे मृत मुलीचे नाव […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेत ‘जन्मनोंद’ घोटाळा…? कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखा सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात अडकली असुन, आर्थिक देवाणघेवाणीतून खोट्या जन्मनोंदी तयार केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. या कथित घोटाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता असुन, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. शिरुर शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस जन्मनोंदी झाल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. या […]

अधिक वाचा..
trupti-sarode

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्ती सरोदे यांना गटात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिंदोडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महिला भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात थंडीचा कडाका; ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

नागरिकांकडून थंडीपासून बचावासाठी विविध उपाययोजना शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा प्रचंड जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी व पहाटे शेकोट्या पेटविल्या जात असून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

शिरूर : सादलगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संपत कारकुड यांना गावातील एकाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. श्री. कारकूड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रेवणनाथ प्रशांत माने उर्फ भैया (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. पत्रकार संपत कारकुड हे आपल्या शेताकडे जात असताना आरोपी माने याने रस्त्यात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात चार वर्षांची बिबट मादी जेरबंद

पिंपरखेड बीटमध्ये आतापर्यंत २७ बिबटे पकडण्यात वन विभागाला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील टेमकरवाडी , तामखरवाडी, शिनगरवाडी आणि गावठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २१) रात्री चार वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली. पिंपरखेड बीट अंतर्गत आतापर्यंत […]

अधिक वाचा..