Leader

आरक्षणातील गोंधळामुळे जिल्हा परिषदांवर अनिश्चितता कायम…

शिरुर (तेजस फडके) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या आरक्षणात ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन न झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राज्यातील २७ पैकी दोन महापालिका चंद्रपूर आणि नागपूर तसेच ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार […]

अधिक वाचा..
dalimb-tree

शिरूर! दोन भावांच्या जमिनीतील १३०० डाळिंब झाडांची निर्दयी तोड; कोणी केली पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर) परिसरात दोन शेतकर्यांनी कष्टाचे पीक फुलत असताना मध्यरात्रीच्या अंधारात घडलेल्या अमानुष प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टात जमीन-वाटपाचा विषय प्रलंबित असतानाच सख्ख्या भावानेच दोन भावांच्या शेतातील तब्बल १३०० डाळिंब झाडे तोडून नासधूस केली आहे. संबंधित झाडे शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात या दोन […]

अधिक वाचा..
mujaffar-kureshi

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! मुजफ्फर कुरेशी यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणुक प्रभाग क्रं २ चे उमेदवार मुजफ्फर कुरेशी यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…

पुणे : बिबट्यांचा मुक्त संचार थांबवण्यासाठी वन विभागाने एक अभिनव योजना आखली आहे. बिबट्यांसाठी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कृत्रिम जंगले तयार करण्यात येत आहेत. शिरूर तालुक्यात पिंपरखेड आणि न्हावरा येथे तसेच जुन्नर आणि मंचर येथे प्रत्येकी एक जंगल विकसित केले जाईल. या चारही ठिकाणच्या जागा निश्चित असून, प्रस्तावाला सरकारी मंजुरी मिळण्याची वन विभागाला प्रतीक्षा आहे. […]

अधिक वाचा..
dalimb-tree

शिरूर तालुक्यात समाजकंटकाने शेतकऱ्यांची डाळिंबाची तब्बल १३०० झाडे तोडली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर ) येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असून अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबुत, शरदवाडी परिसरातील शेतकरी […]

अधिक वाचा..
sharad-bandal

तुकडाबंदी अधिनियम सुधारणा व ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ योजनेची अंमलबजावणी करा : शरद बांदल

शिरुर (तेजस फडके) : तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करून गुंठेवारी दस्त नोंदणी सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा होऊन अनेक महिने उलटले असले, तरीही प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. तात्काळ ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड शरद तुकाराम बांदल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी […]

अधिक वाचा..
aaishwarya-pacharne

शिरूर नगराध्यक्ष निवडणूक! ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला उसळली जोरदार गती…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरातील प्रभाग ३ व संपुर्ण शहरामध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. दोन वेळा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पद भूषवलेल्या अनुभवी महिला उमेदवारांनी यंदा पुन्हा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहत निवडणूक रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्या या कार्यकाळातील विकासकामांबाबत प्रभागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. गत दोन […]

अधिक वाचा..
Rohini-Bankar-Shirur

Video; शिरुर शहराचा सर्वांगीण विकास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार : रोहिणी बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता शिरूरमध्ये शिवसेनेचा प्रचार जोर धरू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहराचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचा निर्धार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी बनकर व शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला आहे. शिरूर शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी शिरूर “शहरवासीयांनी आमच्यावर विश्वास ठेवून […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

राज्यातलं माझं वजन कमी झालंय: दिलीप वळसे पाटील

शिरूर : यंदा काय झाले मलाही समजायला मार्ग नाही पण राज्यातले माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील अल्पमतांनी विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक निकालाची बोच त्यांना लागून राहिलेली आहे. मतदारसंघातील जनतेवर ते अजूनही नाराज असल्याचे दिसून […]

अधिक वाचा..
rajendra-dhaybar

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज […]

अधिक वाचा..