ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवार यांनी दिलेले आव्हान, यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात डाव टाकला असून शिरूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा आज सकाळी […]

अधिक वाचा..
waghale-yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

वाघाळे (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली. वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनी स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

पुणे : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात मारहाण करून गाडीची काच फोडून लाखो रुपये लंपास…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-निमोणे रस्त्यावरील चव्हाणवाडी हद्दीत ओंकार सचिन गवळी (वय २०, रा. पाचर्णेमळा शिरूर) याची रविवारी (ता. १०) रात्री ८.४५च्या सुमारास अज्ञातने कार अडवून रॉडने गाडीची काच फोडून मारहाण केली. गाडीच्या डीकीतील तब्बल १,७२,००० रुपये लंपास केले आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी रात्री ०८.४५ वा. च्या सुमारास चव्हाणवाडी (ता. शिरूर) गावच्या […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगानं वाहू लागले असून, प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम पक्षाकडून सुरू आहे. शिरूर तालुका मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, ‘अमोल कोल्हेंसारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक होती. कुणी उमेदवार मिळत नाही तेव्हा […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

वढू बुद्रुक: वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज (शनिवार) पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत झाला आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शिरुर मतदार संघात महायुती सध्या कोण उमेदवार […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरटयांनी जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र चोरुन नेले असून महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर जास्त विदयुत रोहीत्र चोरीला गेल्याने नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून महीनोमहीने वेळ लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी महागड्या केबल वारंवार चोरीला जात असून या […]

अधिक वाचा..
nitin-thorat

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

शिरूरः आमदाबाद येथील शेतकरी नितीन आर्जुन थोरात यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2021 करिता जाहीर झाला आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून एका शेतकऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. नितीन आर्जुन थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये सघन केशरआंबा, भाजीपाला फळ पिके यामध्ये मेथी कोथिंबीर त्याचबरोबर वांगी टोमॅटो कांदा बटाटा हळद या […]

अधिक वाचा..