ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवार यांनी दिलेले आव्हान, यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात डाव टाकला असून शिरूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा आज सकाळी दिलीप मोहिते यांच्या बंगल्यातील बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांची अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात डाव टाकला आहे. अजित पवार यांच्याकडून शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली जाणार, अशी घोषणा दिलीप मोहिते यांच्या बंगल्यातील बैठकीत करण्यात आली. तसेच, नाना पाटेकरांना आपण विचारलं होतं, पण नाना कसा माणूस आहे, हे तुम्हाला माहीत आहेच, त्यांनी नकार दिला, असे अजित पवार म्हणाले. आता शिवाजी आढळराव पाटील आणि माझं बोलणं झाले आहे. ते खासदार झाल्यावर आमदारांच्या कामात अडथळा आणणार नाहीत, त्यामुळे शिरूरमधून आढळरावच उमदेवार असतील, असे अजित पवार यांनी थेट सांगितले आहे.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीनंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट शड्डूच ठोकला होता. तेव्हापासूनच शिरूरवर संपूर्ण राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. एवढंच नाहीतर या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. पण, त्यानंतर शिरूर मतदारसंघ अजित पवार यांना सोडण्यात आला. अशातच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळरावांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली शिरूरच्या मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत बारी झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बारी मारली. पण कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाचा हात होता. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलं आहेच. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणलं, त्यालाचा पाडण्याचा चंग अजितदादांनी या निवडणुकीत बांधला आहे. अशातच आढरावांना उभं करुन दादा सध्या शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणार का? अजितदादा शिरूरची बारी मारणार का? हे येता काळच सांगणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…