shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असे म्हणत असा चंग अजित पवार यांनी बांधला आहे. या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आत आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर 2009 आणि 2014 साली मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत शर्यत झाली होती. पण, त्यावेळी कोल्हे विजयी झाले होते. पण, आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या सोबत जाऊन पुन्हा शिरुर काबीज करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने आता आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे बारामती नंतर आता शिरुर लोकसभा मतदार संघाकडेही महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष असणार आहे.

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…