Beaten

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गाझी बिर्याणी दुकानातून पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना बिर्याणी संपली असल्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला थोडी तरी बिर्याणी द्या अशी मागणी करत असताना झालेल्या वादातून शेजारी बसलेल्या एकाने वाद घातला. मित्राला घेऊन येत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अतुल संजय मते […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…

पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरातमध्येच पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या खुब्याला मार लागला असून, हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुणे शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शासकीय सुट्टीचे दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार; पाहा तारखा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): दि. २९, ३० व ३१ मार्च २०२४ रोजी शासकीय सुट्टी असूनही दुय्यम निबंधक (दस्त नोंदणी) कार्यालय सुरू राहणार असल्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेले आहेत. नवीन वार्षिक मूल्यदर तक्ते ०१ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. […]

अधिक वाचा..
adhalrao-kolhe

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

जुन्नर : शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे. ही लढत अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केले आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वाद ही घेतला. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिरूर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. मंगलदास बांदल यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उभे ठाकणार आहेत. बांदल यांच्या निर्णयामुळे शिरूर लोकसभेची निवडणूक […]

अधिक वाचा..
shivajirao-adhalrao-patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

मंचरः शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

शिरुर  (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेले असेल, असे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पक्षप्रवेशापूर्वी आढळराव पाटील यांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

शिरूर (तेजस फडके) : धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला; तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

दबंग उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या कामगिरीकडे तालुक्याचे लक्ष.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

शिरुर (तेजस फडके): शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळीच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार आहे. महायुतीमध्ये शिरूर […]

अधिक वाचा..