pune-nagar-highway

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणेः शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके यांनी गेल्या काही दिवसांत पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे कोंडीतून वाहनचालकांची काहीशी सुटका झाली आहे. या मार्गावर खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल होणार असून, त्याचे काम मार्चच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले. राज्यातील पहिला अत्याधुनिक […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील रामलिंग यात्रेच्या नियोजनाची बैठक शिरूर तहसिल कार्यालयात पार पडली

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील शिरुर शहरासह पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या महाशिवरात्रीला होत असलेल्या यात्रा महोत्सवास यंदा एकावन्न वर्षे पूर्ण होत असल्याने यात्रेची मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्साहाच्या नियोजनाची बैठक शुक्रवार दि.१४ रोजी शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरूर शहरापासून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे. www.shirurtaluka.com ने संबंधित विषय उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. एवढे वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

6 लाख ६० हजारांच्या गाडया जप्त  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडीस आणून ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शासनाची मान्यता नसतानाही सेंट चावरा स्कूल सुरु; पालकांची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले कसे ? इराद्या पत्रावरच बोगस पद्धतीने शाळा तब्बल ७ ते ८ वर्ष सुरु ठेवली गेली. यात तेथे इयत्ता १ते ६पर्यत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शासन निर्णयाची पायमल्ली, पालकांची फसवणूक, शिक्षण विभागाची डोळेझाक शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसताना गेली सात – आठ वर्षे सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे.शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये […]

अधिक वाचा..
shikrapur-missing-girl

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या माळवाडी गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांना राजकीय वैमन्यशातून सुपारी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे . मी सुपारी कोणाला दिली याची चौकशी करून या प्रकरणांमध्ये शिरूर पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नाहीतर मस्साजोग सारखे प्रकरण शिरूर तालुक्यात घडल्याशिवाय […]

अधिक वाचा..