prostitute

शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका खासगी बिल्डींगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन जणांसह दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. दोन महिलांसह वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूज (रा. पारनेर, जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) व संकेत […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-interview

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

शिरूरः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर हे गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप हे त्यांचे गाव. सुशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षण आणि बालपण पुणे शहरात गेले. लहान पणापासूनच राजकारणाची आवड असल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरीची संधी असताना नोकरी न करता ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचे ठरवले होते. […]

अधिक वाचा..
shirur-vehicle

शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरांमध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बीजे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त, अल्पवयीन वाहन चालक यांच्या तब्बल ४४ वाहनांवर कारवाई करत ४०, ५०० रु. दंड आकारण्यात आला आहे. शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल […]

अधिक वाचा..
nitin-thorat-interview

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) शिरूर तालुक्यातील आमदाबाद हे नितीन अर्जुन थोरात यांचे गाव. एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील महसूल विभागातून नायब तहसीलदार या पदावून सेवा निवृत्त झाले. नितीन थोरात यांनी एटीडी आणि जीडी आर्ट हे शिक्षण घेतले. पण, नोकरी न करता काळ्या आईची सेवा करण्याचे त्यांनी बालवयातच ठरवले. काळ्या आईची सेवा करत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे विविध […]

अधिक वाचा..
lonikand-traffic

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे : पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरा जवळ असलेल्या केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…

पाबळ (सुनिल जिते) : केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड वस्ती येथील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. साक्षी विशाल साकोरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील साक्षी साकोरे या महिलेचा चार महिन्यांपूर्वी […]

अधिक वाचा..
cash

शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): कासारी (ता. शिरुर) येथील एकाने आपल्या मित्राला कंपनीमध्ये व्यवसाय करुन देतो असे म्हणून तब्बल दहा लाख एक्कावन हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे निलेश तुकाराम नेवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारी येथील निलेश नेवसे हा युवक चाकण येथील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने गावातील महेश […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

शिंगाडवाडी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

शिक्रापूरः अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भारताचे मा राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी (ता. शिरूर) येथे आगळा वेगळा शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शालेय विध्यार्थ्यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर ३० ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव, ता. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून विद्युत रोहित्र चोरीला गेले आहे. शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस विद्युत रोहित्र चोरीला जाण्याचा सत्र सुरू आहे. शिरूर पोलिस स्टेशनला नव्याने आलेले दंबग पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे या विद्युत चोरांना गजाआड करण्याचे मोठे आव्हाण निर्माण आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये वायरमन कुलदिपक ज्ञानेश्वर बेंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. […]

अधिक वाचा..