शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे.

www.shirurtaluka.com ने संबंधित विषय उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. एवढे वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी गटशिक्षण आधिकारी, शिरुर आता काय कारवाई करतात? याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

बेकायदेशीर शाळा सुरु असल्यामुळे राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र शिवाय शाळा चालवण्यात येत असेल येत असेल तर संबंधितांना रुपये १ लाखापर्यंत दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृत चालू राहिल्यास रुपये १० हजार प्रती दिवशी दंड करण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक दिवसाला दहा हजार याप्रमाणे ७ वर्षाचा दंड गट शिक्षण आधिकारी ठोठावणार का? तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकत्यानी दिला आहे.

एकुणच शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर येत असून ७ वर्ष मान्यता न घेता शाळा सुरू राहिलीच कशी? गट शिक्षण आधिकारी या प्रकरणी गुन्हा दाखल करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

लवकरच पत्रव्यवहार करून मान्यता नसल्याने विनापरवाना शाळा चालवल्यामुळे दंडाची रक्कम ठरवली जाईल व गुन्हाही दाखल केला जाईल.
बाळकृष्ण कळमकर
– गटशिक्षण, अधिकारी शिरूर.

धक्कादायक! शासनाची मान्यता नसतानाही सेंट चावरा स्कूल सुरु; पालकांची फसवणूक…

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिक्षकांच्या बदलीसाठी चक्क शाळा भरवली शिरूर पंचायत समितीत…

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…