शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी… मुंबई: हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट […]

अधिक वाचा..

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार; दिपक केसरकर मुंबई: केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय […]

अधिक वाचा..

राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कुत्रीम पाणवठे वन्य जीवांना वरदान

शिरुर तालुक्यात वीस ठिकाणी शिरुर वनविभागाकडून पाणवठे शिक्रापूर: उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना कित्येक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पशु पक्षांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. मात्र शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वनविभागाच्या वतीने कुत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून सदर पाणवठे ऐन उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. शिरुर तालुका नेहमी दुष्काळी समजला जातो. मात्र […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत अल्पवयीन युवतीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मार्केट यार्ड परिसरात वडिलांसह शेतमाल विक्रीस आलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा पिकअप चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालक अमोल जनार्दन वायदंडे याचे विरुद्ध बाललैंगिक अत्याचारसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मार्केट यार्ड मध्ये पिडीत अल्पवयीन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात माजी उपसरपंचाला ऐन यात्रेवेळी पोलिसांकडून अटक

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत फोडली काच शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये दारु पिऊन आरडाओरडा करत गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केंदूरच्या ऐन यात्रेवेळी माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल…

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले. कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र बँकेची ९ महीन्यातच शेतकऱ्यांकडून नियमबाहय पिककर्ज वसुली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत असतानाच येथील नियमित कर्जदार खातेदारांना चक्क 9 महिन्यातच नुतनीकरण करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने सदर शेतकरी खातेदारांना धक्का बसला आहे. एका नियमित पीककर्ज खातेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत असूनही त्यास नोटीस आल्याने त्यांनी बँकेत जावून चौकशी […]

अधिक वाचा..

किराणा दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडुन चौकशीत अजून तीन गुन्हे उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31 वर्षे) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तपासा दरम्यान त्याने […]

अधिक वाचा..

वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला […]

अधिक वाचा..