कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही…

मुंबई: शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीजपुरवठा खंडित होणे ही बाब दुर्दैवी आहे. यापुढे कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सुनील राणे, संजय सावकारे, अशोक चव्हाण, ॲड.आशिष शेलार, दिलीप वळसे- पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित […]

अधिक वाचा..

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

मुंबई: विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस खूप व्यस्त असेल आणि तुम्ही इतरांच्या कामासाठी धावत राहाल. या दिवशी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात आणि तुमचे काही पैसे त्यांच्यावर खर्चही होऊ शकतात. कार्यक्षेत्रातही तुमच्या पक्षात काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे इतर सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटेल. तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने वातावरण खूप प्रसन्न कराल आणि नशीबही तुमच्या सोबत राहील. घरातील सदस्याच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कार महामार्गालगत उलटून दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या कारला पाठीमागील वाहनाने धडक दिल्याने कार महामार्गाच्या कडेला उलटून दोघे जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघातात प्रीतम आप्पासाहेब खोत व रोहित आबासाहेब कोतवाल हे दोघे जखमी झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रीतम खोत हे त्यांच्या […]

अधिक वाचा..

सणसवाडीत बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणारे अटक

ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथे विद्युत रोहीत्राचा धक्का लागून एका मोराचा मृत्यू झाला असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोराचा पंचनामा करत शवविच्छेदन करत दहन करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथील सुनील धुमाळ हे आज सकाळच्या सुमारास शेतात गेले असताना शेतातील विद्युत […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये संभ्रम शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असून सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसताना त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिरुर पोलिस स्टेशनने चोरी गेलेले नागरिकांचे 20 मोबाईल केले परत

महाराष्ट्रसह परराज्यातून चोरी गेलेले 3 लाख 28 हजार रुपयांचे मोबाईल शोधून आणले शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेले मोबाईल शिरुर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मोठया शिताफीने तपास करत नागरीकांना परत केल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व पोलिस मित्र दिपक बढे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे राज्याबाहेरील पश्चिम बंगाल, […]

अधिक वाचा..

पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार प्रदान 

पुणे: काव्यमित्र संस्थेच्या वतीने जाणारा राष्ट्रीय युवा चेतना हा पुरस्कार पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना नुकताच प्रदान केला गेला. काव्य मित्र संस्था गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी यंदाच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवत काही दिवसांपूर्वी पुरस्कार घोषणा केली होती. युवा चेतना पुरस्कारासोबतच आदर्श माता व राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार सुद्धा यावेळी […]

अधिक वाचा..

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी […]

अधिक वाचा..