शासकीय नोकर मालक की नोकर…? सर्व सामान्य लोकांशी करतात अरेरावी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालय या सरकारी कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असुन या कार्यालयात वर्षानुवर्षे कामासाठी खेटे घालणाऱ्या नागरिकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडुन अरेरावी केली जात असुन हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लोखंडी खोऱ्याने, लाकडी दांडक्याने, दगडाने भावकीत हाणामारी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील जांबुत येथे भावकीच्या दोन गटात लोखंडी खोऱ्याने, लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण झाली असुन संजय देवराम गुरव यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दशरथ भैरव गुरव, चंद्रकांत भैरव गुरव,दत्तात्रय शिवराम गुरव या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात (दि 20) फेब्रुवारी रोजी सकाळी 8 च्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC च्या मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये प्रवेश करताना पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या मुख्य चौकाचे “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले असुन या मुख्य चौकाच्या नामंतराचा गेल्या पाच वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” ने मार्गी लावला असल्याचे श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रांजणगाव गणपतीचे माजी उपसरपंच राहुल पवार यांनी सांगितले. रांजणगाव गणपती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने गव्हाच्या पेंढया पेटवून केले शेतकऱ्याचे नुकसान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे 60 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या विद्यालयात शिवमेघडंबरीचे अनावरण

शिवजयंतीच्या मुहूर्तावर भक्तीशक्ती शिल्पाचे देखील उदघाटन शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्पाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून कान्हूरचे विद्यालय हे विद्यालयात शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्प उभारणारे पुणे जिल्ह्यातील विद्यालय ठरले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च […]

अधिक वाचा..

आरणगावात शिवजयंती उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राजगड किल्ल्याहून शिवज्योत आणत गावातील शिवज्योतीची मिरवणूक काढून शिवव्याख्याते सुनीता ठोबरे यांच्या सूश्राव्य व्याख्यानाने शिवजजयंती साजरी करण्यात आली आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असताना सकाळच्या सुमारास किल्ले राजगड येथील शिवज्योत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शिवाजी कोण होता पुस्तकांचे वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजी कोण होता? या पुस्तकीचे वाटप करण्यात आले. शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालय तसेच तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुज़र प्रशाला येथे शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनीच्या कामगारांनी लांबवला चौदा लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या […]

अधिक वाचा..