दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला पोलिसांकडून ठोकल्या बेड्या…

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या असून सुरज विष्णू शितोळे असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे. माझ्या नादाला लागले तर कापून टाकीन असे म्हणून कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई जयदीप देवकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक युवक हातात कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून दहशत निर्माण करत असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्या जवळील कोयता जप्त केला. याबाबत पोलीस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुरज विष्णू शितोळे रा. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल दांडगे हे करत आहे.

शिक्रापूर परिसरात गुन्हेगारील बसणार आळा…

शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी हाती घेऊन एक महिना होत असतानाच त्यांनी एका महिन्यात तब्बल 2 पिस्तुल, 8 जिवंत काडतुसे, 3 तलवार, 3 कोयते जप्त केले असून मागील आठवड्यात दहशत माजवणाऱ्यांची त्यांनी धिंड काढली होती. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीला नक्कीच आळा बसणार असल्याचे दिसून येत आहे.