शिंदोडीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत दाखवत सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा महसुल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावात शेतीच्या नावाखाली सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा उघडपणे सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गावातीलच एका मातीचोर रेकॉर्डवरील गुंडाना गावात आणुन त्यांच्या दहशतीच्या जोरावर घोड नदीतील मातीचे उत्खनन करुन विटभट्ट्यांना मातीचा पुरवठा सुरु असुन शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा […]

अधिक वाचा..

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर टिका करताना पवारांचा नेमका पक्ष कोणता…?” अशी टिका केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्या वक्तव्यामुळे माऊली कटके यांच्यावर शिरुर तालुक्यातील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टिकेची झोड उठविली आहे.  आमदार […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण करत जबरी चोरी

शिक्रापुर (ओमकार भोरडे) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौक ते एमआयडीसी फाटा दरम्यान एका प्रवाशाला रिक्षातुन प्रवास करत असताना दोन अज्ञात रिक्षाचालकांनी शिवीगाळ, मारहाण करत मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे. शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास बाबासाहेब दराडे […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या वादातून माय-लेकासह मेहुण्याला मारहाण

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) उसने दिलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन झालेल्या वादातुन एका तरुणासह त्याच्या आई व मेव्हण्याला मारहाण केल्याची घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी नाना सर्जेराव दगडे (वय ३३, व्यवसाय मेंढपाळ, रा. अरणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आकाशात चमकणारे दिवे आणि सतत फिरणारी ही संशयास्पद वस्तू नेमकी काय आहे, याबाबत गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान […]

अधिक वाचा..

कारेगावच्या यश इन चौकात कचऱ्याचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगावच्या प्रवेशद्वारासारखी ओळख असलेल्या यश इन चौकात गेल्या अनेक दिवसांपासुन कचऱ्याचा प्रचंड ढिग साचलेला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावाच्या मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असताना स्वच्छतेच्या गप्पा मारणारे ग्रामपंचायत प्रशासन नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.   […]

अधिक वाचा..

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभे असलेले महावितरणचे विजेचे खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा अधिक प्रमाणात जाहिरातबाजीसाठी वापरले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यालगतच्या अनेक खांबांवर CCTV कॅमेरे, प्लॉटिंग प्रकल्प, जमीन खरेदी-विक्री तसेच विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचा सर्रास गैरवापर होत असून संबंधित विभाग मात्र याकडे कानाडोळा करत […]

अधिक वाचा..

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा करुन तो विटभट्ट्यांसाठी विकण्याचा सपाटा गावातीलच एका मातीचोराने लावला या मातीमाफियाने गावच्या भूभागावर अक्षरशः बुलडोझर फिरवला आहे. शासनाचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या काळ्या धंद्याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने आणि घोड पाटबंधारे विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 18 जून रोजी सायंकाळी  सुमारास निमोणे […]

अधिक वाचा..

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सुरुवात केली असुन पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातुन तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा सुमारे १ लाख २४ […]

अधिक वाचा..