पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता […]

अधिक वाचा..

जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा […]

अधिक वाचा..

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे; देवेंद्र फडणवीस

मुंबई: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022’ मध्ये फडणवीस बोलत होते. ‘क्रेड’ कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी […]

अधिक वाचा..

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनवणार; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

लाखेवाडी येथील गायरान जमीन चोरीला…? जमीन दाखवा बक्षीस मिळवा

सविंदणे (अरुणकुमार मोटे): लाखेवाडी (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान गट तसेच गाव नकाशा वरील रस्ते, सर्वे नंबरचे रस्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे १० एकर ३० गुंठे या सर्व क्षेत्रावर स्थानिक जमीनधारक मालकांनी अतिक्रमण केले आहे. मौजे लाखेवाडी येथील सरकारी गायरान गट नंबर २३९ एकूण क्षेत्र १० एकर ३० गुंठे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भुमि अभिलेख शिरुर या […]

अधिक वाचा..

धक्कादायक! जन्मदात्या वडिलांनीच अल्पवयीन मुलाची केली जाळून हत्या, पहा कारण…

पाकिस्तान: वर्गात गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात घडली. आपल्या अल्पवयीन मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रईस अमरोवी कॉलनीत आरोपी वडील नजीर याने 12 वर्षीय मुलगा शाहीर याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना (दि.14) सप्टेंबर […]

अधिक वाचा..

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत विरुद्ध दिशेने पिकअप आल्याने चार वाहने आदळली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे विरुद्ध दिशेने एक पिक अप आल्याने चक्क चार वाहने एकमेकांवर आदळून अपघात होऊन अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून शंकर इंगळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ बी […]

अधिक वाचा..

आरणगावला आदर्श दुध उत्पादक संस्था पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने नुकताच आदर्श प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेने गावातून मागील 5 वर्षापासून दररोज q हजार 200 लिटर दुध संकलित करत त्याचा […]

अधिक वाचा..

मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर विधानसभा मतदारसंघ मधील मयत मतदारांची नांवे वगळण्याची प्रक्रिया निवडणुक विभागाकडून सुरु करण्यांत आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून मयत मतदारांची यादी निवडणुक विभागाने मागविली आहे. त्यापैकी ग्रामपंचायतीच्या जन्म मृत्यू नोंदवहीत ज्यांच्या मृत्यूची नोंद असेल अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. शिक्रापूर गावातील ३१ मयत मतदारांची नावे नुकतीच […]

अधिक वाचा..