अष्टविनायक महामार्गालगत मलठण येथे धोकादायक विहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्तीच्या पुलाजवळ अष्टविनायक महामार्गावर अगदी खेटून एक विहीर आहे. गाड्यांचा वेग आणि तिथे थोडेसे वळण असल्याने केव्हाही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे विहीरीजवळील संरक्षण कठडयाची उंची वाढवण्याची मागणी मलठण ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे. तसेच अष्टविनायक महार्गावर कवठे येमाई गावठाणात इस्टिमेट प्रमाणे रस्ता केला नाही असा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या परिसरात गाडीची काच फोडून एक लाख रुपये लंपास…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी वेंदाता हॉस्पिटलसमोरच पार्क केलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून दुपारी 3:30 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वप्निल सुभाष थोरात (रा. रामलिंग रोड, शिरुर) या युवकाच्या गाडीतील एक लाख रुपये लंपास केले आहेत. याबाबत सविस्तर माहीती अशी की (दि. १५) सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ०३.४५ वाजल्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात खंडणीसाठी सिनेस्टाईल अपहरण करत प्राणघातक हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील मुबंई बाजार येथे घरासमोरून शतपावली करत असताना अभिषेक गंगावणे या युवकाचे ११ इसमांनी खंडणीसाठी अपहरण करुन त्याला दशक्रिया घाटात नेऊन त्याला तलवार हॉकीस्टीक व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार (दि १५) सप्टेबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास […]

अधिक वाचा..

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

नाशिक: मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही साप आणि मुंगूसाचे व्हिडीओ पाहिले असतील. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगूसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केली आहे. तसं पाहता साप […]

अधिक वाचा..

CM शिंदेनी घेतलेल्या बैठकीबाबत खासदार कोल्हेंनी व्यक्त केला खेद…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरुर हवेली मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत एक बैठक घेतली. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत बैठक घेतली. मात्र या बैठकीला लोकांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्याची खंत खासदार कोल्हे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश […]

अधिक वाचा..

मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना मिळणार सोन्याची अंगठी, कुठे पहा…

चेन्नईः भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील RSRM या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,’ असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे. प्रत्येक अंगठी ही सुमारे 2 […]

अधिक वाचा..

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का…

मुंबई: बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात […]

अधिक वाचा..

पुणे विद्यापीठाच्या निकालातील त्रुटींमुळे विद्यार्थी आक्रमक…

पुणे : नुकताच पुणे विद्यापीठाने एलएलबी आणि बीएएलएलबीचा निकाल जाहीर केला. एकीकडे कंम्बाईन पासिंगमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचा दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना पेपर मध्ये शून्य मार्क मिळाल्याचे आढळून आले. तसेच अनेक विषयांना सारखेच गुण मिळाले आहेत असे समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्या. पुरवणी जोडून चांगला पेपर लिहून देखील शून्य […]

अधिक वाचा..

मिस कॉल मुळे झाले प्रेम, पण सत्य कळताच महिलेने पतीला भरचौकात…

मुंबई: प्रेमात फसवणूक झालेल्या विवाहितेने पतीला जाहीरपणे पकडून बेदम मारहाण केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती प्रकरण पटना गया रेल्वे विभागातील कोर्ट हॉल्ट स्टेशनचे आहे. भरदिवसा पतीला पत्नीने धडा शिकवला. विवाहितेने पतीवर प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शेखपुरा जिल्ह्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सांगितले की, मिस्ड […]

अधिक वाचा..