धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत

नायगाव: वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या कडेला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग स्थानिकांना दिसली होती. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून […]

अधिक वाचा..

मला पकडा सोडू नका असं स्वतःच ओरडू लागला चोर अन…

पाटणा: चोरी झाली की चोराला पकडा चोराला पकडा असं इतर लोक ओरडतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात स्वतः चोरच मला पकडा, सोडू नका, धरुन ठेवा, असं ओरडताना दिसला. ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करायला गेलेल्या या चोरट्यासोबत असं काही घडलं की तो प्रवाशांकडे आपल्या जीवाची भीक मागू लागला. सोशल मीडियावर ट्रेनमध्ये मोबाईल […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या शेतकरी रुग्णाला सरपंच व आमदारांचा आधार

सरपंच शारदा गायकवाड व आमदार अशोक पवारांमुळे नऊ लाख माफ शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याचा अपघात झालेला असताना हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर तब्बल 12 लाख रुपये खर्च आलेला असताना सरपंच शारदा गायकवाड यांच्या मुळे आमदार अशोक पवार यांच्यामुळे सदर रुग्णाचे हॉस्पिटलचे 9 लाख रुपये बिल माफ झाल्याने शेतकरी गरीब रुग्णाला महिला सरपंच […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले. […]

अधिक वाचा..
Crime

भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस, पहा नक्की काय केल…

नवी दिल्ली: माजी IAS अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीण सुनीताने गंभीर आरोप केला आहे. सुनीताने सांगितलं की, सीमा पात्रा यांनी तिच्यावर लोखंडी वस्तूने वार करुन तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीराच्या अनेक भागावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत. तिने सांगितलं की मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर…

किरकटवाडी: पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मैत्रीचा बहाना करत करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारातून सदर मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही…!

मुंबई: मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. राज्यात नोकरभरतीही होऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा आरक्षण परिषदेत देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी, एल्गार पुकारण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! फसवणूक केल्याप्रकरणी सैराट फेममधील हा अभिनेता अडचणीत

नगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती […]

अधिक वाचा..
body

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची होस्टेलमध्ये आत्महत्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या सानिका बबन यनभर महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सानिका यनभर […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत कडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत ठोस उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कडे करण्यात आली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यासह इतर ठिकाणी व्यवसायिक कचरा […]

अधिक वाचा..