व्यंकटेशकृपा कारखान्याची साखर घेऊन जाणारा टेम्पो उलटला

शिरूर तालुका

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील दोन टेम्पोच्या धडकेत टेम्पो उलटून दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार अपघात होत असताना 2 कारच्या धडकेत 1 कार रस्त्यावर उलटल्याची घटना ताजी असतानाच आता व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची साखर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एका वाहनाने धडक दिल्याने टेम्पो रस्त्यावर उलटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राधाकृष्ण भानुदास मोरे या चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने पंडित वाडेकर हे चालक त्यांच्या ताब्यातील एम एच १४ जि डी ७३६५ या टेम्पो मधून व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची साखर घेऊन जात असताना जातेगाव फाटा येथील पंजाबी ढाबा समोरुन चाकण बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ के ए ४५२७ या टेम्पोची वाडेकर यांच्या टेम्पोला जोरदार धडक बसली यावेळी वाडेकर यांच्या टेम्पोला धडकून समोरील टेम्पो शेजारी असलेल्या पेट्रोलपंपच्या भिंतीवर जाऊन आदळला. मात्र यावेळी टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने साखर घेऊन जाणारा टेम्पो रस्त्यावरच उलटला तर दोन्ही वाहनांचे नुकसान होत टेम्पो चालक जखमी झाले.

याबाबत पंडित मच्छिंद्र वाडेकर (वय ४9) रा. बहुळ ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक राधाकृष्ण भानुदास मोरे रा. पंढरकर चाळ, दळवी नगर आकुर्डी पुणे या टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.