शिरुर तालुक्यात नागाशी खेळणाऱ्यावर कारवाईची मागणी

नागासोबत स्टंटचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने सर्पमित्र संतप्त शिक्रापूर: शिरुर तालुक्यात एक युवक विषारी नागाशी खेळत नागाला डिवचून जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली असून सदर युवकाचा शोध घेत कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरुर वनविभागाकडे केली आहे. शिरुर तालुक्यातील एका युवकाने विषारी नागाच्या शेपटीला पकडून नागाला हाताने डवचून […]

अधिक वाचा..

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला […]

अधिक वाचा..

मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेल्या 10 ते 11 वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी साजरी करण्याबाबत मातंग नवनिर्माण सेना सातत्याने पाठवापुरावा करत असुन याबाबत पुन्हा एकदा याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे सर्व […]

अधिक वाचा..

माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत: एकनाथ खडसे

शिक्रापूरच्या माऊलीनाथ हॉस्पिटलला एकनाथ खडसेंची भेट शिक्रापूर: डॉक्टर त्यांच्या कार्यातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे मोलाचे काम करत असतात. शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेसह अनेक समाजपयोगी कार्ये केले जात असल्याची बाब कौतुकास्पद असून माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमच्या प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण परिचय द्यावा लागेल. लव्ह लाईफच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत संवेदनशील असेल. प्रेमसंबंधात तुम्ही खूप व्यवहारी राहावे आणि संयमाने चालावे लागेल अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणे हिताचे आहे. पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. वृषभ: नोकरीत प्रभाव वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कामाच्या […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दुचाकीच्या धडकेत दोन दुचाकीचालक जखमी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरुन आलेल्या दोघा दुचाकी चालकांना धडक असून दोघे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरेंदर नागसाई मराबी या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन परमेश्वर लोंढे हे त्यांच्या ताब्यातील एम […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवतींची सुधार गृहात रवानगी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा ऋषिकेश जाधव वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सीए

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ऋषिकेश सतीश जाधव याने जिद्दीच्या जोरावर यश संपादित करत सिए परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या एकविसाव्या वर्षी चार्टर अकाऊंटंट बनण्याचा विक्रम केला असल्याने शिक्रापूर सह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश जाधव याचे शिक्षण वाघोली येथील जेएसपीएम विद्यालयातून सुरु झाले. ऋषिकेशचे वडील उच्चशिक्षित असून खाजगी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशीभविष्य

मेष: आजचा दिवस तुम्हाला चांगले अनुभव देईल. आज तुमच्या चांगल्या कृतींमुळे तुमचा व तुमच्या कुटूंबाचा अभिमान वाढेल. तुमचे नाव मोठे होईल. तुम्हाला निर्णय क्षमतेचा फायदा देखील मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रस असल्याने, कदाचित तुम्ही आज काही विधी पूर्ण करण्याचा विचार करु शकता. वृषभ: आज तुमचे मन आनंदित होईल. मुलाचे यश तसेच सर्वोत्कृष्ट आचरण पाहून तुम्हाला […]

अधिक वाचा..

Video: आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीत दौंडकर कुटुंबाला स्थान द्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आमदार बाबुराव स्मारक समितीमध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणी करंजावणे ग्रामस्थांनी केली असुन आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे पदाधिकारी स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान न ठेवता त्यांचा वारंवार अपमान करत असते. […]

अधिक वाचा..