रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत फियाट कंपनीचे सिक्युरीटी ऑफीसर सुशांत शंभु शुक्ला (वय 53) रा. प्लॉट नं.39, 10 वा मजला, एल-२, पामग्रोज हाऊसिंग सोसायटी, बी.टी. कावडे रोड घोरपडी यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फियाट कंपनीतील कंपनीचे सप्लाय मॅनेजर अतिषकुमार शिवाजी कांबळे (रा. मांजरडे, ता. तासगाव जि. सांगली) सध्या (रा. प्लॉट नं. ६०१ बॉल्क ए निर्माण अल्टीस रेडसन ब्यु हॉटेलचे पाठीमागे खराडी ता. हवेली जि.पुणे) यांनी फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्या विरुध्द रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय सरजीने या घटनेचा पुढील तपास करत आहेत.